ETV Bharat / sports

शारजाहमध्ये मयांकची वादळी खेळी, नावावर केला मोठा विक्रम - ipl 2020 fastest ton

मयांकचे हे आयपीएल कारकीर्दीचे पहिले शतक आहे, तर या मोसमातील कोणत्याही फलंदाजाचे हे दुसरे शतक आहे. या सामन्यात तो ५० चेंडूत १०६ धावा करून बाद झाला.

mayank agarwal smashes his maiden ipl ton vs rajasthan royals
शारजाहमध्ये मयांकची वादळी खेळी, नावावर केला मोठा विक्रम
author img

By

Published : Sep 27, 2020, 10:14 PM IST

शारजाह - यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शतक झळकावले होते. आता पंजाबचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने शारजाहमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. त्याने अवघ्या ४५ चेंडूत शतक ठोकले. आयपीएलमधील भारतीय क्रिकेटपटूचे हे दुसरे वेगवान शतक ठरले. २०१०मध्ये राजस्थानकडून खेळताना युसूफ पठाणने ३७ चेंडूत शतक केले होते.

मयांकचे हे आयपीएल कारकीर्दीचे पहिले शतक आहे, तर या मोसमातील कोणत्याही फलंदाजाचे हे दुसरे शतक आहे. या सामन्यात तो ५० चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. टॉम करनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो बाद झाला. मयांक आणि राहुलने १८३ धावांची सलामी भागीदारी रचली.

आयपीएलमध्ये वेगवान शतक (भारतीय) -

  • २०१० - युसूफ पठाण - ३७ चेंडूत शतक. विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २०२० - मयांक अग्रवाल - ४५ चेंडूत शतक. विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २०१० - मुरली विजय - ४६ चेंडूत शतक. विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २०१६ - विराट कोहली - ४७ चेंडूत शतक. विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • २०११ - वीरेंद्र सेहवाग - ४८ चेंडूत शतक. विरुद्ध डेक्कन चार्जर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.