ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचे मानसिक स्वास्थ बिघडले, अनिश्चित काळासाठी खेळणार नाही क्रिकेट - ऑस्ट्रेलियन क्रिकेटर विषयी बातमी

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने अनेकदा फलंदाजीसह गोलंदाजीत करिश्मा दाखवत संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मात्र, सद्या त्याने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने, क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही मॅक्सवेलला पाठिंबा दर्शवला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूचे मानसिक स्वास्थ बिघडले, अनिश्चित काळासाठी खेळणार नाही क्रिकेट
author img

By

Published : Oct 31, 2019, 1:34 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे सांगत अनिश्चित काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. सध्या मॅक्सवेल श्रीलंकेविरुध्द सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील २ सामने संपले असून राहिलेल्या मालिकेतूनही मॅक्सवेलने माघार घेतली आहे.

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने अनेकदा फलंदाजीसह गोलंदाजीत करिश्मा दाखवत संघाला विजय मिळवून दिलेला आहे. मात्र, सध्या त्याने मानसिक स्वास्थ ठीक नसल्याने, क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही मॅक्सवेलला पाठिंबा दर्शवला आहे.

याविषयी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'खेळाडूचे शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. हे आमचे कर्तव्य आहे. मॅक्सवेलच्या तब्येतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, यासाठी बोर्ड आवश्यक ती मदत करणार आहे.'

दरम्यान, श्रीलंकेविरुध्दच्या टी-२० मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुध्द खेळणार आहे. मॅक्सवेलने या मालिकेतूनही माघार घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मॅक्सवेल तंदूरुस्त व्हावा यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील आहे.

हेही वाचा - शाकिब अल हसनची पत्नी उम्मी शिशिर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, पाहा तिचे फोटो

हेही वाचा - ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.