ETV Bharat / sports

कुलदीप यादववर मॅथ्यू हेडनची स्तुतिसुमने, शेन वॉर्नशी केली तुलना

हेडनने कुलदीपची तुलना केली शेन वॉर्नशी

author img

By

Published : Mar 11, 2019, 11:44 PM IST

संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन भारतीय क्रिकेट संघाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीने चांगलाच प्रभावित झाला आहे. हेडनने कुलदीपची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नशी केली आहे.

हेडनने सांगितले की कुलदीपने टाकलेले चेंडू हे एकदम शेन वॉर्न टाकायचा त्या पद्धतीनेच फलंदाजापर्यंत पोहोचतात. या कारणामुळेच सध्याच्या काळात कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरत आहे. कुलदीपने आतापर्यंत भारतासाठी ६ कसोटी, ४३ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले असून त्यात त्यामध्ये अनुक्रमे २४, ८६ आणि ३५ विकेट घेतले आहेत.

भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलविषयी बोलताना हेडन म्हणाला, की चहल हा एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाज आहे. तो स्टंप टू स्टंप चेंडू टाकतो. त्याने टाकलेले चेंडू हे एकदम सरळ असून त्याच्याकडे ड्रिफ्ट नाहीय. जर मी फलंदाज असतो आणि मला युजवेंद्र कींवा कुलदीप यांच्यातील एका गोलंदाजांचा सामना करायचा असल्यास मी चहलचा सामना केला असता, असेही तो म्हणाला.

Intro:Body:

Matthew Hayden compares Kuldeep Yadav with Shane Warne

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.