दिल्ली - आयपीएलच्या बाराव्या मोसमातील पाचव्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात भारताचा दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आणि भविष्यातील त्याचा वारसदार म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये ओळखला जाणारा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत समोरासमोर येणार असल्याने या लढतीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीने मुंबई इंडियन्सला तर चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला पराभूत करुन आयपीएलच्या रणसंग्रामाची विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानवर खेळला जाणारा हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
ऐकिकडे चेन्नईच्या संघात महेंद्रसिंह धोनी, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गजांचा भरणा आहे. तर दुसरीकडे दिल्लीत श्रेयस अय्यर ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, संदीप लामिछाने, हनुमा विहारी यासांरखे युवा खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात ज्युनियर आणि सिनीयर असा सामना पाहयला भेटेल. तसेच दिल्लीचा अनुभवी फलंदाज शिखर धवन या सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
असे असतील दोन्ही संघ
चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार ), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, मोहित शर्मा, के. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन जगदीशन, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर.
दिल्ली कॅपिटल्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा.