ETV Bharat / sports

न्यूझीलंडचा गुप्टिल विचित्र पद्धतीने बाद, चेंडू पूल करण्याच्या नादात पाय लागला यष्ट्यांना - Andyle Fahuquo

आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याच्या नादात गुप्टिलचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा पाय यष्ट्यांना लागला आणि तो बाद झाला.

मार्टिन गुप्टिल
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:58 AM IST

Updated : Jun 20, 2019, 2:25 AM IST

बर्मिंघन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा सामना होता. या सामन्यात मार्टिन गुप्टिल आफ्रिकेचा वेगवाग गोलंदाज आंदिले फेहुक्वायोच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारायच्या नादात विचित्र पद्धतीने बाद झाला. त्याचे संतुलन बिघडले आणि तो हिट विकेट झाला.

गुप्टिल १५ वे षटक खेळत असताना आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंदिले फेहुक्वायो त्याला गोलंदाजी करत होता. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याच्या नादात गुप्टिलचे संतुलन बिघडले आणि त्याचा पाय यष्ट्यांना लागला. क्षणभर कोणालाही काही कळाले नाही. क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी धावत होता, तर यष्टीरक्षक गुप्टिलची विकेट मिळाल्याने जल्लोष करत होता. गुप्टिलने या सामन्यात ५९ चेंडूत ३४ धावा केल्या.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 20, 2019, 2:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.