नेपिअर - न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने चांगली कामगिरी करताना ८ गड्यांनी धमाकेदार विजय मिळवला. न्यूझीलंडच्या विजयात सलामीवीर मार्टिन गप्टिलने चांगली कामगिरी करताना ११७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
- — Dhoni Fan (@WastingBalls) February 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Dhoni Fan (@WastingBalls) February 13, 2019
">— Dhoni Fan (@WastingBalls) February 13, 2019
गप्टिलला त्याच्या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर, गप्टिलला त्याची पत्नी लॉरा मॅकगोल्डरिकने प्रश्न विचारले. गप्टिल म्हणाला, आम्ही बांगलादेशला लवकर आटोपले. सुरुवातीच्या १० षटकात ४ गडी बाद केल्यानंतर आम्ही त्यांना लवकर रोखले. गप्टिलने संघाचे कौतुक करत मुलाखत संपवली.
गप्टिलची पत्नी सामन्याचे प्रक्षेपण करणाऱया वाहिनीची अधिकृत अँकर आहे. या सामन्यासाठी मुलाखत घेण्यासाठी गप्टिलची पत्नी लॉरा मॅकगोल्डरिकला नियूक्त करण्यात आले होते.