मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरान फिंचने एकदिवसीय सामन्यामध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीचा नजराणा दाखवत नाबाद १८८ धावा चोपल्या. फिंचचे आक्रमक रुप पाहून गोलंदाज हतबल झाल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श चषक एकदिवसीय स्पर्धेत फिंचने मंगळवारी व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधीत्व करताना ही वादळी खेळी केली.
व्हिक्टोरिया विरुध्द क्विन्सलँड या संघात झालेल्या सामन्यात फिंचने हा कारनामा करत संघाला एकतर्फा विजय मिळवून दिला. क्विन्सलँड संघाने प्रथम फलंदाजी करत व्हिक्टोरियाला निर्धारीत ५० षटकात ३०५ धावांचे लक्ष्य दिले होते. व्हिक्टोरिया संघाने हे लक्ष्य ४४.२ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. फिंचने या सामन्यात १५१ चेंडूत नाबाद १८८ धावांची खेळी केली. त्याने अर्धशतक २९ चेंडूत तर शतक ७३ चेंडूत पूर्ण केले.
-
How about these two early sixes from Aaron Finch!
— cricket.com.au (@cricketcomau) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Victoria off to a fast start at the Junction, watch LIVE: https://t.co/csGckzrIS7 #MarshCup pic.twitter.com/uwUWj2sDdS
">How about these two early sixes from Aaron Finch!
— cricket.com.au (@cricketcomau) October 1, 2019
Victoria off to a fast start at the Junction, watch LIVE: https://t.co/csGckzrIS7 #MarshCup pic.twitter.com/uwUWj2sDdSHow about these two early sixes from Aaron Finch!
— cricket.com.au (@cricketcomau) October 1, 2019
Victoria off to a fast start at the Junction, watch LIVE: https://t.co/csGckzrIS7 #MarshCup pic.twitter.com/uwUWj2sDdS
हेही वाचा - श्रीलंकेच्या संघासाठी पाकने लावला 'कर्फ्यू', गंभीरने व्हिडिओ शेअर करत उडवली खिल्ली
फिंचने शतकानंतर मात्र, गिअर बदलत आक्रमक पावित्रा घेतला आणि क्विन्सलँडच्या गोलदाजांचा खरपूस समाचार घेतला. फिंचने आपल्या १८८ धावांच्या वादळी खेळीत १४ षटकार आणि ११ चौकार लगावले. महत्त्वाचे म्हणजे, फिंचने चौकार आणि षटकार यांच्याच मदतीने १२८ धावा झोडपल्या आहेत. फिंचची ही खेळी ऑस्ट्रेलियातील स्थानिक एकदिवसीय सामन्यातील पाचवी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली आहे. मात्र, फिंच आपल्या पहिल्या द्विशतकाला फक्त १२ धावांनी मुकला.
हेही वाचा - India vs South Africa १st Test : पंतचा पत्ता कट, २२ महिन्यानंतर साहाचे संघात पुनरागमन