ब्रिस्बेन - स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याचा मानसही त्याने बोलून दाखवला. ''एकदिवसीय क्रिकेटमध्ये उंची गाठण्यासाठी शेवटच्या षटकातील फलंदाजीवर भर देणार आहे'', असे 14 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या लाबुशेनने म्हटले.
लाबुशेन म्हणाला, "सुधारणा करण्यावर नेहमी भर असतो. एकदिवसीय क्रिकेट हे असे एक क्षेत्र आहे जिथे मला नक्कीच चांगली कामगिरी करणे सुरू ठेवायचे आहे. सामन्याच्या शेवटी शक्य तितकी फटकेबाजी करणे हा एक पर्याय आहे."
तो पुढे म्हणाला, "हे खेळाचे सौंदर्य आहे. आपण जिथे असतो तिथे समाधानी कधीच नसतो. स्वत:ला सर्वोत्तम ठिकाणी ठेवण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवायची आहे. मला कोणत्याही प्रकारे स्वत: ला क्रिकेटच्या दोन स्वरूपात मर्यादित राहायचे नाही. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेट खेळण्याची माझी इच्छा आहे."