नवी दिल्ली - टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मनीष पांडेची होणारी जीवनसाथी अभिनेत्री असून लवकरच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० वर्षीय मनीष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिताशी लग्न करणार आहे. दरम्यान, या दोघांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. मनिष सध्या विजय हजारे चषकामध्ये कर्नाटक संघाचे कर्णधारपद भूषवत आहे.
कोण आहे अश्रिता -
अश्रिता शेट्टी ही दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री आहे. तिने इंद्रजीत, उद्यम एनएच ४ आणि ओरू कन्नियुम मुनू कलावनीगलूम या चित्रपटात अभिनय केला आहे. दरम्यान, अश्रिता लवकरच आणखी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनीष आणि अश्रिताचा विवाह सोहळा २ डिसेंबरला मुंबईमध्ये होणार आहे. दरम्यान, मनिष आणि अश्रिता यांच्यात रिलेशनशीपबाबत चर्चा रंगल्या होत्या. लग्नाच्या घोषणेनंतर मात्र, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा - भारतानं 'कबुल' म्हटलं तरच आशिया चषक पाकमध्ये होणार, अन्यथा...
हेही वाचा - बायकोला जास्त वेळ दिल्याने टीम इंडियातील खेळाडू संकटात!