मुंबई - काही दिवसांपूर्वी पंजाबमधील पटियाला शहरात, निहंगा टोळक्याच्या हल्ल्यात पंजाब पोलीस अधिकारी हरजीत सिंग यांना आपला हात गमवावा लागला होता. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने या धाडसी पोलिसाला 'सॅल्यूट' ठोकला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊनची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. अशातच पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेतही वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पटियाला शहरात भाजी मंडईला जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील एका टोळक्याने पोलिसांवर हल्ला चढवला. यात एका माथेफिरूने सहायक पोलीस निरीक्षक हरजीत सिंग यांचा तलवारीने हातच तोडला. हात तुटून पडल्यानंतरही सिंग यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी तुटलेला हात उचलून घेतला आणि गाडीवर बसत रुग्णालय गाठले.
चंदीगड येथील पीजीआय हॉस्पिटलमध्ये हरजीत सिंग यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. या घटनेनंतर 'मै भी हरजीत सिंग हा हॅशटॅग ट्रेंन्ड झाला. अनेक सेलिब्रेटींनी हरजीत सिंग यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतूक केले. युवराज सिंगनेही मंगळवारी एक व्हिडीओ पोस्ट करून हरजीत सिंग यांना सलाम ठोकला आहे.
युवराजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, 'हरजीत सिंग यांचे धाडस आणि दृढनिश्चय देशातील अनेकांसाठी प्रेरणाई आहे. निःस्वार्थ सेवा करणाऱ्या या पोलिसांचे आभार. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, डॉक्टरांनी हरजीत यांच्या हातावर साडेसात तास शस्त्रक्रिया केली. यानंतर तुटलेला हात प्लास्टिक शस्त्रक्रियेद्वारे जोडला गेला आहे. या हल्ला प्रकरणी पंजाब पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा - कोरोनाही 'या' हेअरकटमुळे कन्फ्यूझ होईल, हरभजनने शेअर केला फोटो
हेही वाचा - भारताने आकारलेले शुल्क न भरल्याने, यजमानपद गमावले; झाला 'इतका' दंड