मुंबई वि. तमिळनाडू - अश्विनच्या चिवट झुंजीमुळे मुंबई-तमिळनाडू लढत अनिर्णीत
फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या चिवट झुंजीमुळे मुंबई-तमिळनाडू लढत अनिर्णीत सुटली आहे. अश्विनच्या ७९ आणि साईकिशोरच्या ४२ धावांमुळे तामिळनाडूला पहिल्या डावात ३२४ धावा करता आल्या. त्यानंतर पुन्हा फलंदाजीला उतरलेल्या तमिळनाडूने एक विकेट गमावत ४८ धावा केल्या आणि सामन्यात बरोबरी पत्करली. या सामन्यात १५४ धावांची खेळी करणाऱ्या मुंबईच्या आदित्य तरेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक -
- मुंबई (पहिला डाव) - ४८८/१० (आदित्य तरे १५४ धावा, शम्स मुलाणी ८७ धावा, शशांक अतार्डे ५८ धावा. साई किशोर ४ बळी, र. अश्विन ३ बळी)
- तामिळनाडू (पहिला डाव) - ३२४/१० (अभिनव मुकुंद ५८ धावा, सुर्यप्रकाश ४१ धावा, रविचंद्रन अश्विन ७९ धावा, साई किशोर ४२ धावा. शम्स मुलाणी ७२/४, तुषार देशपांडे ७०/२)
- तामिळनाडू (दुसरा डाव) - ४८/१ (अभिनव मुकुंद नाबाद १९ धावा, सुर्यप्रकाश १८ धावा. शशांक अतार्डे ६/१) लढत अनिर्णीत.
महाराष्ट्र वि. झारखंड - महाराष्ट्राची झारखंडवर ८ गड्यांनी मात
रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड विरूद्ध खेळलेल्या सामन्यात महाराष्ट्राने ८ गड्यांनी दमदार विजय मिळवला आहे. १७० धावांवर पहिला डाव गडगडल्यानंतर झारखंडने दुसऱ्या डावात ३११ धावा केल्या आणि महाराष्ट्राला विजयासाठी ४८ धावांचे आव्हान दिले. महाराष्ट्राने हे आव्हान दोन गडी गमावत आणि ५.५ षटकांत पूर्ण केले. पहिल्या डावात १४० धावा आणि संपूर्ण सामन्यात तीन बळी घेणारा महाराष्ट्राचा अझीम काझी सामन्याचा मानकरी ठरला. फॉलोऑनची नामुष्की ओढवल्यानंतर झारखंडने दुसऱ्या डावात कुमार सूरजच्या ९२, सौरभ तिवारीच्या ८७ आणि एमडी नाझीमच्या ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद ३११ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक -
- महाराष्ट्र (पहिला डाव) - ४३४/१० (विशांत मोरे १२० धावा, अझीम काझी १४० धावा. उत्कर्ष सिंग १३०/५, राहुल शुक्ला ६३/३)
- झारखंड (पहिला डाव) - १७०/१० (सौरभ तिवारी ६२ धावा, विराट सिंग ४३ धावा. सत्यजीत बच्छाव ५५/५)
- झारखंड (दुसरा डाव) - ३११/१० (कुमार सूरज ९२ धावा, सौरभ तिवारी ८७ धावा. सत्यजीत बच्छाव १२४/४, मुकेश चौधरी ४९/३)
- महाराष्ट्र (दुसरा डाव) - ४८/२ (नौशाद शेख २६ धावा. राहुल शुक्ला २४/२) महाराष्ट्र विजयी.