पोटशेफस्ट्रूम - भारत आणि बांगलादेश यांच्या युवा संघात विश्व करंडक स्पर्धेचा (१९ वर्षांखालील) अंतिम सामना काही वेळात खेळला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ या सामन्यासह पाचव्यांदा करंडक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.
भारतीय युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघही फुल्ल फॉर्मात आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे.
-
WATCH: #TeamIndia extends best wishes to the U19 team for the #U19CWC final. 💪👏
— BCCI (@BCCI) February 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Let’s get behind our boys as they are just one step away from winning the title. Send in your wishes. 🇮🇳🇮🇳 – by @RajalArora
Full Video here 📽️👉👉 https://t.co/WrLqMNLL0D pic.twitter.com/hTx1qFMPbz
">WATCH: #TeamIndia extends best wishes to the U19 team for the #U19CWC final. 💪👏
— BCCI (@BCCI) February 8, 2020
Let’s get behind our boys as they are just one step away from winning the title. Send in your wishes. 🇮🇳🇮🇳 – by @RajalArora
Full Video here 📽️👉👉 https://t.co/WrLqMNLL0D pic.twitter.com/hTx1qFMPbzWATCH: #TeamIndia extends best wishes to the U19 team for the #U19CWC final. 💪👏
— BCCI (@BCCI) February 8, 2020
Let’s get behind our boys as they are just one step away from winning the title. Send in your wishes. 🇮🇳🇮🇳 – by @RajalArora
Full Video here 📽️👉👉 https://t.co/WrLqMNLL0D pic.twitter.com/hTx1qFMPbz
आतापर्यंत झालेल्या १३ युवा विश्व करंडकापैकी सर्वाधिक चार वेळा भारताने विजेतेपद, तर दोनदा उपविजेतेपद आणि दोनदा तिसरे स्थान पटकावले आहे. तसेच २०१८ च्या युवा विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.
हेही वाचा - U-१९ महामुकाबला : युवा टीम इंडियाची पाचव्या विजेतेपदावर नजर
हेही वाचा - संथगतीचा भारताप्रमाणे न्यूझीलंडलाही फटका; खेळाडूंच्या ६० टक्के मानधनावर कात्री