ETV Bharat / sports

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची सिडनी कसोटीवर मजबूत पकड, टीम इंडिया बॅकफूटवर - भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी न्यूज

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर २ बाद १०३ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन ४७ तर स्टिव्ह स्मिथ २९ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावातील मिळून एकूण १९७ धावांची आघाडी झाली आहे.

Live Cricket Score, India vs Australia, 3rd Test: Australia 103/2 at Stumps on Day 3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची सिडनी कसोटीवर मजबूत पकड, टीम इंडिया बॅकफूटवर
author img

By

Published : Jan 9, 2021, 12:56 PM IST

Updated : Jan 9, 2021, 1:12 PM IST

सिडनी - रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाअखेर २ बाद १०३ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन ४७ तर स्टिव्ह स्मिथ २९ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावातील मिळून एकूण १९७ धावांची आघाडी झाली आहे.

पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत अपयशी ठरले. तर जडेजाने तळातील फलंदाजांना घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जाडेजाने नाबाद २८ धावांची खेळी केली. अखेरीस भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाली.

तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे बाद झाल्यानंतर हनुमा विहारी धावबाद झाला. तेव्हा पंत-पुजारा या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्या चेंडूवर हेजलवूडने पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. यानंतर आर. अश्विन (१०), जसप्रीत बुमराह (००), नवदीप सैनी (३) आणि मोहम्मद सिराज (६) झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक चार बळी घेतले. तर हेजलवूडने दोन गडी टिपले. तर स्टार्कला एक विकेट मिळाली.

पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरूवात केली. पण, सिराजने पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या विल पुकोविस्कीला (१०) यष्टीरक्षक वृद्धीमान साहा करवी झेलबाद केले. यानंतर अश्विनने डेव्हिड वॉर्नरला (१३) पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. संघाची अवस्था २ बाद ३५ अशी असताना, मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथने डाव सावरला. दोघांनी सुरूवातीला सावध पावित्रा घेत धावा केल्या. जम बसल्यानंतर दोघांनी धावगती वाढवली. तिसऱ्या दिवसाअखेर दोघे अनुक्रमे ४७ आणि २९ धावांवर नाबाद खेळत आहेत.

हेही वाचा - IND VS AUS : ऋषभ पंतला दुखापत, वृद्धीमान साहा यष्टीरक्षणासाठी मैदानावर

हेही वाचा - Ind vs Aus : पंतपाठोपाठ जडेजालाही दुखापत, भारतीय संघ अडचणीत

Last Updated : Jan 9, 2021, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.