नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने अकरा सदस्यीय सर्वोत्कृष्ट भारतीय संघ निवडला आहे. त्याने या संघाची कमान सौरव गांगुलीकडे सोपवली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील भारतीय खेळाडूंना वॉर्नने या संघात स्थान दिले आहे.
विशेष म्हणजे, या संघात वॉर्नने भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनाही स्थान दिले आहे. मला नवज्योतसिंग सिद्धूला निवडावे लागले, कारण फिरकीविरूद्ध तो चांगला खेळायचा. इतकेच नव्हे तर, सिद्धूविरूद्ध गोलंदाजी करणाऱ्या इतर सर्व फिरकीपटूंनी सिद्धूला सर्वोत्तम म्हटले आहे, असे वॉर्नने इन्स्टाग्रामवर सांगितले.
सिद्धू यांनी भारताकडून ५१ कसोटी आणि १६६ एकदिवसीय सामने खेळले असून यात त्यांनी अनुक्रमे ३२०२ आणि ४४१३ धावा केल्या आहेत.
वॉर्नने निवडलेला संघ -
वीरेंद्र सेहवाग, नवज्योतसिंग सिद्धू, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरभ गांगुली (कर्णधार), कपिल देव, हरभजन सिंग, नयन मोंगिया, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ.