ETV Bharat / sports

ICC T-२० Ranking : विराटची सुधारणा, तर रोहित टॉप-१० मधून बाहेर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात विराट एक स्थान वर सरकला आहे, परंतु सद्या विश्रांतीवर असलेल्या रोहित शर्माला मात्र टॉप-१० मधून बाहेर जावे लागले आहे.

author img

By

Published : Jan 11, 2020, 4:04 PM IST

Updated : Jan 11, 2020, 4:41 PM IST

latest icc t20i ranking : virat kohli in top10 and rohit sharma out top 10
ICC T-20 Ranking : विराटची क्रमवारीत सुधारणा, तर रोहित टॉप-१० मधून बाहेर

दुबई - भारतीय संघाने नववर्षांची सुरूवात विजयी मालिकेने केली. श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका भारताने २-० ने जिंकली. या सामन्यात शिखर धवन (५२) आणि लोकेश राहुल (५४) यांच्या अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीनेही सहाव्या क्रमांकावर येत २६ धावांचे योगदान दिले. दरम्यान, या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात विराट एक स्थान वर सरकला आहे, परंतु सध्या विश्रांतीवर असलेल्या रोहित शर्माला मात्र टॉप-१० मधून बाहेर जावे लागले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनूसार, विराट दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर सरकला आहे. रोहित मात्र नवव्या स्थानावरून १३ व्या स्थानी गेला आहे.

टी-२० च्या गोलंदाजीच्या यादीत, भारताचा एकही गोलंदाज टॉप-१० मध्ये नाही. तसेच दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंना टॉप-१० मध्ये स्थान मिळालेले नाही.

टी-२० तील टॉप-१० फलंदाज

  1. बाबर आझम (पाकिस्तान) - ८७९ गुण
  2. अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया ) - ८१० गुण
  3. डेव्हिड मलान (इंग्लंड) - ७८२ गुण
  4. कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड) - ७८० गुण
  5. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - ७६६ गुण
  6. लोकेश राहुल (भारत) - ७६० गुण
  7. एव्हिन लुइस (वेस्ट इंडिज) - ६९९ गुण
  8. हझरतुल्लाह जझाई (अफगाणिस्तान) - ६९२ गुण
  9. विराट कोहली (भारत) - ६८३ गुण
  10. इयॉन मॉर्गन (इंग्लंड) - ६५३ गुण

Intro:Body:

sports news

Conclusion:
Last Updated : Jan 11, 2020, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.