आबुधाबी - मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या तेराव्या हंगामात एका विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या 2 धावांची गरज होती. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात चौकार खेचत हा विक्रम नोंदवला.
रोहितच्या आधी आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा विराट कोहली आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनी पार केला आहे. विराटने 180 तर रैनाने 193 सामन्यात 5 हजाराचा टप्पा पार केला. तर रोहितने 192 सामन्यात खेळताना हा विक्रम केला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाज -
- विराट कोहली - 180 सामने, 5430 धावा
- सुरेश रैना - 193 सामने, 5368 धावा
- रोहित शर्मा - 192 सामने, 5000* धावा
- डेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावा
- शिखर धवन - 162 सामने, 4648 धावा
- एबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावा
- ख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावा
- महेंद्रसिंह धोनी - 193 सामने, 4476 धावा
- रॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावा
- गौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा
हेही वाचा - KKR vs RR: राजस्थानच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल; केकेआरची मुसंडी
हेही वाचा - जोफ्रा आर्चरने टाकला IPL 2020 मधील सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजाला भरली धडकी