मुंबई - जागतिक प्रतिबंधक द्रव्य संस्थेने ( WADA) उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेराचे निलंबन केले होते. पण, आता वाडाने चुकीचा अहवाल सादर केल्याचे उघड झाले आहे. यामुळे वाडा संस्थेला ५ लाख अमेरिकन डॉलरची नुकसान भरपाई परेराला द्यावी लागली आहे. श्रीलंकन क्रिकेटचे माजी अध्यक्ष थिलंगा सुमाथिपाला यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
काय आहे प्रकरण -
वाडाने डिसेंबर २०१५ मध्ये कुशल परेराचे उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी निलंबन केलं होतं. तेव्हा या निलंबनाच्या कारवाई विरोधात परेराने अपील केले. मार्च २०१६ मध्ये परेरा इंग्लंडमध्ये गेला आणि तेथे त्याची पॉलीग्राफ चाचणी झाली. या चाचणीत परेराने कोणतेही उत्तेजक द्रव्य घेतले नसल्याचे समोर आले.
परेराने पॉलीग्राफचा अहवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे पाठवला. पण, या कालावधील परेराला महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले. त्यात आशिया कप आणि टी-२० विश्व करंडक स्पर्धेचाही समावेश होता. या सर्व कारणांनी परेरा याला वाडा संस्थेला नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.
कुशल परेराने श्रीलंका संघाकडून १८ कसोटी, १०१ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात त्याने कसोटी ९३४, एकदिवसीयमध्ये २८२५ तर टी-२० १२९३ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - खेळाडू नाही तर चक्क पंच दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर
हेही वाचा - आयपीएलसह आरसीबीला कोरोनाचा फटका, काय आहे प्रकरण वाचा...