जोहान्सबर्ग - पाकिस्तानविरुद्ध ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये हेनरिक क्लासेन दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार असेल. क्लासेन प्रथमच राष्ट्रीय संघाचे नेतृत्व स्वीकारणार आहे. क्लासेनने आतापर्यंत आपल्या देशासाठी एक कसोटी, १७ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका मंडळाने (सीएसए) क्लासेनला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वाखालील कसोटी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला परत येईल आणि यशस्वीरित्या क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करेल.
हेही वाचा - धोनीच्या संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू
सीएसए क्रिकेटचा संचालक ग्रॅमी स्मिथ म्हणाला की, कोरोनाच्या संकटामुळे क्रीडा संघटनांना दौर्यासाठी नवे मार्ग तयार करण्यास भाग पाडले गेले आहे. त्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकण्यासाठी थोडा वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी सज्ज होऊ शकू.''
उभय संघांत ११, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी तीन सामन्यांची टी-२० मालिका लाहोरमध्ये खेळली जाईल.
संघ : हेनरिक क्लासेन (कर्णधार), नांद्रे बर्गर, ओखुले सेले, जूनियर डाला, बजोर्न फॉर्ट्युइन, रीझा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, जानेमान मलान, डेव्हिड मिलर, अॅन्डिले फेहुल्क्वायो, ड्वेन प्रेटोरियस, रायन रिचेल्टन, तबरेझ शम्सी, झोन-झोन स्मट्स, पीट व्हॅन बिलीजॉन, ग्लेनटन स्ट्रूमॅन, जॅक स्निमॅन.