वेलिंग्टन - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर के. एल. राहुल सध्या स्वप्नवत क्रिकेट खेळत आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये राहुलने मोलाची भूमिका साकारली होती. याच सामन्यात त्याने आपल्याच कर्णधाराचा विक्रम मोडित काढला आहे.
हेही वाचा - 'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?'
टी-२० क्रिकेटमध्ये राहुल चार हजार धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. या प्रकरणात त्याने विराट कोहलीला मागे टाकले. विराटने १३८ डावांत चार हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर, राहुलने ११७ डावांत ही कामगिरी केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा राहुल जगातील चौथा वेगवान फलंदाज ठरला आहे.
राहुलने टी-२० मध्ये भारतासाठी ४० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने १४६.४३ च्या स्ट्राइक रेटने १४१६ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने भारताकडून दोन शतकेही ठोकली आहेत. आयपीएलमध्ये राहुलने ६७ सामन्यात १९७७ धावा केल्या आहेत.