ETV Bharat / sports

KKR है तैयार..! ट्रेनिंग कँपआधी खेळाडू क्वारंटाइन

author img

By

Published : Mar 22, 2021, 4:43 PM IST

कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचे फोटो शेअर केले आहेत.

kkr-players-begin-quarantine-ahead-of-ipl-2021-training-camp
KKR है तैयार..! ट्रेनिंग कँपआधी खेळाडू क्वारंटाइन

कोलकाता - कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कँपची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचे फोटो शेअर केले आहेत.

कोलकाताने हे फोटो शेअर करताना त्याला, क्वारंटाइन टाईम. या हंगामासाठी खेळाडू तयार आहेत. कँपची सुरूवात होणार आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर या हंगामात कोलकाताचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. उभय संघातील हा सामना चेन्नईत खेळला जाईल.

मागील हंगामात कार्तिकने स्पर्धेच्या मध्यातंरापर्यंत कर्णधारपद भूषवले होते. यानंतर त्याने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संघ व्यवस्थापनाने इयॉन मॉर्गनकडे कर्णधारपद सोपविले. या हंगामात मॉर्गनच कोलकाताचा कर्णधारपद भूषवणार आहे.

हेही वाचा - 'सूर्यकुमारमुळे विराटला सलामीला येण्याची संधी मिळाली'

हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.