शारजाह - कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात देवदत्त पडीक्कलला बाद करत रसेलने ही कामगिरी केली. या सामन्यात बंगळुरूने कोलकाताला ८२ धावांनी पराभूत केले.
-
Tiiiimbbeeerrrrr!
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Russell gets his 300th wicket, dismissing Padikkal!
RCB 67/1 (7.4)#KKRHaiTaiyaar #Dream11IPL #RCBvKKR pic.twitter.com/v2U9pUsJXL
">Tiiiimbbeeerrrrr!
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 12, 2020
Russell gets his 300th wicket, dismissing Padikkal!
RCB 67/1 (7.4)#KKRHaiTaiyaar #Dream11IPL #RCBvKKR pic.twitter.com/v2U9pUsJXLTiiiimbbeeerrrrr!
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 12, 2020
Russell gets his 300th wicket, dismissing Padikkal!
RCB 67/1 (7.4)#KKRHaiTaiyaar #Dream11IPL #RCBvKKR pic.twitter.com/v2U9pUsJXL
टी-२० स्वरूपात ३०० बळी घेणारा रसेल जगातील दहावा गोलंदाज आहे. ३३७व्या टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो ५०० बळींसह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दुसर्या स्थानावर आहे.
याशिवाय विंडीजचा सुनील नरिन (३९०), दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर (३८०), पाकिस्तानचा सोहेल तन्वीर (३६२), बांगलादेशचा शकीब अल-हसन (३५४), पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (३३९), अफगाणिस्तानचा राशिद खान (३१७) आणि पाकिस्तानचा वहाब रियाज (३०४) यांचादेखील या यादीत समावेश आहे.
रसेलने बंगळुरूविरुद्ध ४ षटकांत ५१ धावा देऊन दोन बळी घेतले. रसेलने आयपीएलच्या ७१ सामन्यात ६१ बळी घेतले आहेत.