ETV Bharat / sports

'खेल रत्न'साठी भज्जीचा अर्ज फेटाळला, तर 'अर्जुन' पुरस्कारापासून द्युती चंदही वंचित - bhajji

क्रीडा मंत्रालयाने या दोन पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. ही यादी लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

'खेल रत्न'साठी भज्जीचा अर्ज फेटाळला, तर 'अर्जुन' पुरस्कारापासून द्युती चंदही वंचित
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:19 PM IST

नवी दिल्ली - भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला निराशेला सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या खेल रत्न पुरस्कारासाठी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याच्यासह द्युती चंदही 'अर्जुन' पुरस्कारापासून वंचित राहणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने या दोन पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. आणि ही यादी लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. यंदा बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती. मात्र, खेल रत्न पुरस्कारासाठी कोणाचेही नाव पाठवले नाही.

हरभजनच्या शिफारसीचा अर्ज 25 जूनला पाठवण्यात आला. पंजाब सरकारने त्याच्या नावाची शिफारस केली होती. तर, अर्जुन पुरस्कारासाठी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने द्युतीचे नाव पाठवले नव्हते. या दोघांव्यतिरिक्त, आशियाई स्पर्धेतील ८०० मीटर विजेता धावपटू मनजीत सिंहचाही अर्जुन पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

इटलीमध्ये द्युती चंदने इतिहास घडवला होता. द्युतीने ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्सच्या 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत, आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळे, 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

Intro:Body:

khel ratna award denied for harbhajan and arjun award rejected for dyuti chand

khel ratna award, application rejected, harbhajan, dyuti chand, indian cricketer, spinner, bhajji, arjun award 

'खेल रत्न'साठी भज्जीचा अर्ज फेटाळला, तर 'अर्जुन' पुरस्कारापासून द्युती चंदही वंचित

नवी दिल्ली - भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला निराशेला सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या खेल रत्न पुरस्कारासाठी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याच्यासह द्युती चंदही 'अर्जुन' पुरस्कारापासून वंचित राहणार आहे. 

क्रीडा मंत्रालयाने या दोन पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. आणि ही यादी लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. यंदा बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती. मात्र, खेल रत्न पुरस्कारासाठी कोणाचेही नाव पाठवले नाही.

हरभजनच्या शिफारसीचा अर्ज 25 जूनला पाठवण्यात आला. पंजाब सरकारने त्याच्या नावाची शिफारस केली होती. तर, अर्जुन पुरस्कारासाठी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने द्युतीचे नाव पाठवले नव्हते. या दोघांव्यतिरिक्त, आशियाई स्पर्धेतील ८०० मीटर विजेता धावपटू मनजीत सिंहचाही अर्जुन पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. 

इटलीमध्ये द्युती चंदने इतिहास घडवला होता. द्युतीने ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्सच्या 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत, आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळे, 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.