रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीला खेळाडूंनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. अनुभवी खेळाडू महेंद्र सिंह धोनीने त्याच्या सहकाऱ्यांना आर्मीच्या टोप्या वाटल्या. यावेळी टीम इंडिया बेस्ट फिनिशर केदार जाधव याने धोनीकडून टोपी घेण्याअगोदर त्याला मानाचा सेल्यूट ठोकला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्यानंतर भारतीय संघ निळ्या टोप्यांऐवजी आर्मी टोप्या घालून मैदानात उतरले. मागील महिन्यात पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० पेक्षा अधिक जवानांना वीरमरण आले. त्यामुळे देशभरातून या सैनिकांना वेगवगळ्यापद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संघानेही या जवानांना आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला.
धोनी हा सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहे. त्याच्याच हस्ते संघातील सहाकाऱ्यांना इंडियन आर्मीच्या टोप्या वाटण्यात आल्या.