बंगळुरू - कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती. आता महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकनेही आयपीएल पुढे ढकला, अशी मागणी केली आहे. यामुळे आयपीएलला धक्का बसणार असल्याचे दिसत आहे.
आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. आता कर्नाटक सरकारने आयपीएलवर बंदी घालावी किंवा स्पर्धा पुढे ढकलावी, अशी मागणी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. जर या मागणीला केंद्राची मान्यता मिळाली, तर कर्नाटकमध्ये सामने होणार नाहीत.
याआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरमध्ये बोलताना, कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. यामुळे आयपीएल नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू केली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे सांगितले आहे.
केंद्र सरकारने जर कर्नाटकची मागणी मान्य केली तर बंगळुरूमध्ये सामने होणार नाहीत. यामुळे आरसीबीला दुसरे होम ग्राऊंड शोधावे लागेल किंवा आयपीएल पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला करावी लागेल.
हेही वाचा - EXCLUSIVE: कुलदीप यादवशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित, पाहा काय म्हणाला...
हेही वाचा - IPL २०२० : आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का