नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघात कगिसो रबाडाचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून बरे झाल्यानंतर रबाडा संघात परतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली.
हेही वाचा - ICC पुरस्कारांवर भारताची मोहोर; विराट- धोनीने पटकावले 'हे' पुरस्कार
श्रीलंका संघाचा खेळाडू धनंजय डिसिल्वा सेंच्युरियन कसोटीच्या मध्यात जखमी झाला आहे. त्याच्या जाण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. कसुन रजिता देखील दुखापतीशी लढत आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सुरंगा लकमल आधीच सेंच्युरियन कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
कगिसो रबाडाने जानेवारीत इंग्लंड विरुद्ध सेंट जॉर्ज पार्क येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये रबाडाने चमकदार कामगिरी केली. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना १७ सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची पहिली कसोटी सेंच्युरियन येथे खेळली जात आहे.