नवी दिल्ली - भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार के. श्रीकांत आणि महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांची २०१९ या वर्षीच्या 'सी. के. नायडू जीवन गौरव' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली.
१९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले ६० वर्षीय श्रीकांत यांनी ४३ कसोटीत २ शतके व १२ अर्धशतकांसह २०६२ धावा केल्या आहेत. तर अंजुम चोप्राने १२ कसोटीत ५४८ धावा केल्या. तसेच त्यांनी १२७ एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करताना १ शतक आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. अंजुन यांनी १८ टी-२० सामनेही खेळले आहेत.
श्रीकांत आणि अंजुम चोप्रा यांना पुढल्या वर्षी १२ जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईत रंगणार आहे.
हेही वाचा - न्यूझीलंडला विश्वकरंडकापासून दूर लोटणाऱ्या स्टोक्सला ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’चे नामांकन!
हेही वाचा - गोलंदाज आता 'हेल्मेट' घालून गोलंदाजी करणार, सुरक्षेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे पाऊल