ग्रॅनडा - इंग्लंड आणि विंडिज यांच्यात झालेल्या चौथ्या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांवर हल्ला चढविला. इयॉन मॉर्गन, जोस बटलर, ख्रिस गेल यांच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला. यात यष्टीरक्षक जोस बटलर याने विशेष खेळी करत अनेक विक्रम उद्ध्वस्त केले.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरलेल्या जोस बटलने विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली. पहिल्या ४५ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ६० चेंडूत शतक पूर्ण केले. बटलर बाद होण्यापूर्वी त्याने ७७ चेंडूत १५० धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीत त्याने १२ षटकार आणि १३ चौकार ठोकले. बटलर १९४.८० च्या सरासरीने फलंदाजी करत अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले. तर काही खेळाडूच्या विक्रमांशी बरोबरी साधली.
या शानदार खेळीनंतर जोस बटलरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या वेळा ७० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ वेळा ७० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विराट कोहली आणि शाकिब-अल-हसन यांचा पराक्रम पाठीमागे टाकला. तर वीरेंद्र सेहवाग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या यादीत पहिल्या स्थानी एबी डिविलियर्स पहिल्या स्थानी आहे. त्याने हा पराक्रम ६ वेळा केला आहे.
२८ वर्षीय इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने १२६ सामने खेळला असून त्यात त्याने १०४ डावात ७ शतक आणि १८ अर्धशतकाच्या जोरावर ३ हजार ३६४ धावा केल्या आहेत.
७० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत शतक करणारे खेळाडू
१ एबी डिविलियर्स (दक्षिण अफ्रीका) - ६ वेळा
२ शाहिद आफ्रिदी (पाक), वीरेंद्र सेहवाग (भारत) आणि जोस बटलर (इंग्लंड) - ४ वेळा
३ सनथ जयसूर्या (श्रीलंका) आणि जॉनी बॅयस्टो (इंग्लंड) -३ वेळा
४ विराट कोहली (भारत) आणि शाकिब-अल-हसन (बांग्लादेश) - २ वेळा