मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू जवळपास घरीच थांबले आहेत. ते आपल्या कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात इंग्लंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरही घरीच आहे. पण त्याला घरी राहणं महागात पडल्याचे दिसत आहे. कारण तिची पत्नी लुसी त्याला 'फिट' राहण्यासाठी व्यायामाचे प्रकार शिकवत आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्याची कसोटी मालिका कोरोनाच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आली. यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला. सद्या इंग्लंडचे खेळाडू घरीच आराम करत आहेत. पण बटलरची पत्नी लुसी, बटलरचा व्यायामाचा क्लास घेताना दिसत आहे. बटलरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर केले आहे. यात पत्नी बटलरला व्यायामाचे धडे देताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, बटलर फलंदाजी किटसह व्यायाम करताना दिसत आहे. लुसी बटलरला व्यायामाचे पाच प्रकार शिकवत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, बटलरची पत्नी लुसी ही योग टीचर आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सर्व क्रिकेटचे सामने रद्द केले आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम आयपीएलवरही झाला आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलमध्ये बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे.
हेही वाचा - Corona Virus : ..तर ऑलिम्पिक पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही, जपानने दिले 'हे' संकेत
हेही वाचा - Covid १९ : शोएब अख्तर म्हणाला, भारताकडून पाकिस्तानच्या लोकांनी 'हे' शिकले पाहिजे