ETV Bharat / sports

परदेशी खेळाडूंमुळेच साहेबांचा संघ २७ वर्षांनंतर अंतिम फेरीत; वाचा कोण आहेत 'ते' विदेशी पाहुणे - ENGLAND

संपूर्ण जगाला क्रिकेटची देन देणाऱ्या इंग्लंडने तब्बल २७ वर्षानंतर विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंडने दर्जेदार खेळ केला. मात्र, यात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती परदेशी खेळाडूंनी. होय परदेशी खेळाडूनीच. इंग्लंड संघात असलेला कर्णधार इयॉन मॉर्गन, जोफ्रा आर्चर, जेसन रॉय, टॉम करेन आणि बेन स्टोक्स यांचा जन्म हा मूळचा इंग्लंडचा नाही.

परदेशी खेळाडूंमुळेच इंग्लंड अंतिम फेरीत; वाचा कोण आहेत विदेशी पाहुणे
author img

By

Published : Jul 13, 2019, 10:07 PM IST

Updated : Jul 13, 2019, 11:36 PM IST

लंडन - संपूर्ण जगाला क्रिकेटची देन देणाऱ्या इंग्लंडने तब्बल २७ वर्षानंतर विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंडने दर्जेदार खेळ केला. मात्र, यात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती परदेशी खेळाडूंनी. होय परदेशी खेळाडूनीच. इंग्लंड संघात असलेला कर्णधार इयॉन मॉर्गन, जोप्रा आर्चर, जेसन रॉय, टॉम करेन आणि बेन स्टोक्स यांचा जन्म हा मूळचा इंग्लंडचा नाही.

परदेशात जन्मलेले खेळाडू इंग्लंडकडून खेळण्याची परंपरा फार जुनी आहे. २७ वर्षापूर्वी म्हणजे १९९२ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये इंग्लंड संघात तब्बल सहा खेळाडू परदेशात जन्मलेले होते. त्यांची नावे अशी, ग्रॅम हिक (हरारे), अॅलन लॅम्ब (केप प्रॉव्हिन्स), क्रिस लुईस (गयाना), डरमॉट रिव (हाँगकाँग), डेरेक प्रिंगल (केनया) आणि फिल डिफ्रिटस (डॉमनिका) आहेत.

तेव्हा याच खेळाडूंच्या जोरावर इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, त्यांना विश्वविजेता होता आले नाही. पाकिस्तानच्या इम्रान खान आर्मीने त्यांचा २२ धावांनी पराभव केला. त्यानंतर इंग्लंडने तब्बल २७ वर्षांनंतर अंतिम सामन्यात प्रवेश केला. दिवसागणिक सांगायचे झाल्यास इंग्लंड ९९६९ दिवसांनी अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी योगदान दिलं ते परदेशी खेळाडूंनीच.

वाचा इंग्लंड संघातील परदेशात जन्म घेतलेले खेळाडू -
इयॉन मॉर्गन
- इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवणाऱ्या मॉर्गनचा जन्म आयरलँडच्या डबालिनमध्ये झाला. त्याने वयाच्या १६ वर्षी आयरलँड संघाकडून प्रदार्पण केले. त्यानंतर ४ वर्षांनी तो २००७ साली विश्वकरंडक खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला गेला. मॉर्गनमुळेच आयरलँडचा संघ २००७ मध्ये २०११ साली होणाऱ्या विश्वकंरडकासाठी पात्र ठरला. तेव्हा त्याच वर्षी मॉर्गनने आयरलँड सोडून इंग्लंड संघात प्रवेश केला.

jofra-archer-ben-stokes-and-eoin-morgan-do-not-birth-in-england
इयॉन मॉर्गन

बेन स्टोक्स - सध्याच्या घडीला सर्वोकृष्ट अष्टपैलू म्हणून लोकप्रिय असलेला २८ वर्षीय बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचे वडील अँड्रय़ू स्टोक्स यांची इंग्लंडच्या वोकिंग टाऊन रग्बी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर स्टोक्स कुटुंबीय इंग्लंडला स्थायिक झाले. स्टोक्सने २०११मध्ये इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

बेन स्टोक्स

जोफ्रा आर्चर - हा मूळचा वेस्ट इंडिजन आहे. त्याने २०१८ च्या बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे तो प्रकाशझोतात आला. जोफ्रा मूळचा वेस्ट इंडियन असला तरी त्याने इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू केवीन पीटरसनने जोप्राला विश्वकरंडक स्पर्धेच्या संघात कोणत्याही परिस्थितीत घ्या. त्यासाठी नियम बदलावे लागले तरी चालेल असे सांगितले होते. अवघ्या तीन सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आर्चरला विश्वकरंडकात खेळण्याची संधी मिळाली. जोप्राने २०१४ मध्ये वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रतिनिधित्व केले होते.

जोफ्रा आर्चर

जेसन रॉय - इंग्लंडचा स्टार फलंदाज जेसन रॉय हा मूळचा साऊथ आफ्रिकेतील डर्बनचा रहिवाशी आहे. त्याने इंग्लंडकडून खेळण्यास सुरूवात केली.

जेसन रॉय

टॉम करेन - हाही साऊथ आफ्रिकेतील केप टाऊनचा रहिवाशी असून तो इंग्लंडकडून विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे.

टॉम करेन

Intro:Body:

sports

Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.