रांची - झारखंडचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता धोनीला पुन्हा एकदा भारताच्या निळ्या जर्सीत पाहता येणार नाही. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला रांचीमध्ये धोनीसाठी निवृत्तीचा सामना आयोजित करण्याची विनंती केली आहे.
धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सोरेन म्हणाले, "देश आणि झारखंडला अनेक अभिमानाचे आणि उत्साहाचे क्षण देणारा माही (महेंद्रसिंह धोनी) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आम्ही आता झारखंडचा लाल-माहीला निळ्या जर्सीत पाहू शकणार नाही. परंतु, देशवासीयांचे हृदय अद्याप भरलेले नाही. आमच्या माहीचा निवृत्तीचा सामना रांची येथे झाला पाहिजे. या सामन्याचे संपूर्ण जग साक्षीदार होईल. मी बीसीसीआयकडे ही विनंती करतो आहे. माहीच्या या निवृत्तीच्या सामन्याचे आयोजन झारखंड करेल."
-
हम सबके चहेते झारखण्ड का लाल माही को नीली जर्सी पहने अब नहीं देख पायेंगे। लेकिन देशवासियों का दिल अभी भरा नहीं। मैं मानता हूँ। हमारे माही का एक फ़ेयरवेल मैच रांची में हो जिसका गवाह पूरा विश्व बने। @BCCI से अपील करना चाहूँगा। माही का फेयरवेल मैच कराया जाये। मेजबानी झारखण्ड करेगा।
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) August 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हम सबके चहेते झारखण्ड का लाल माही को नीली जर्सी पहने अब नहीं देख पायेंगे। लेकिन देशवासियों का दिल अभी भरा नहीं। मैं मानता हूँ। हमारे माही का एक फ़ेयरवेल मैच रांची में हो जिसका गवाह पूरा विश्व बने। @BCCI से अपील करना चाहूँगा। माही का फेयरवेल मैच कराया जाये। मेजबानी झारखण्ड करेगा।
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) August 15, 2020हम सबके चहेते झारखण्ड का लाल माही को नीली जर्सी पहने अब नहीं देख पायेंगे। लेकिन देशवासियों का दिल अभी भरा नहीं। मैं मानता हूँ। हमारे माही का एक फ़ेयरवेल मैच रांची में हो जिसका गवाह पूरा विश्व बने। @BCCI से अपील करना चाहूँगा। माही का फेयरवेल मैच कराया जाये। मेजबानी झारखण्ड करेगा।
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) August 15, 2020
शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने आपल्या शैलीनुसार इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीच्या कारकिर्दितील छायाचित्रे आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कभी कभी' या चित्रपटातील 'मैं पल दो पल का शायर हूं...' हे गायक मुकेश यांच्या आवाजातील गीत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ ४ मिनिट आणि ७ सेकंदाचा आहे. याद्वारे धोनीने त्याच्या कारकिर्दितील आठवणींना उजाळा दिला आहे.