राजकोट - विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी सौराष्ट संघाचे कर्णधारपद डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाटकट याच्याकडे सोपविण्यात आली आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघाने गुरूवारी यांची घोषणा केली.
विजय हजारे करंडकाची सुरूवात २० फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी सौराष्ट्र संघाने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात जयदेव उनाटकट याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
सौराष्ट्र संघाचा समावेश विजय हजारे करंडक स्पर्धेच्या एलिट ग्रुप ई मध्ये आहे. यात सौराष्ट्रसमोर जम्मू-काश्मीर, हरियाणा, बंगाल, चंदिगढ आणि सेना या संघाचे आव्हान आहे. सौराष्ट्र आपला पहिला सामना २१ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळणार आहे.
विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी असा आहे सौराष्ट्रचा संघ -
जयदेव उनादकट (कर्णधार), अवि बारोट, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, हार्विक देसाई, अर्पित वासवडा, कमलेश मकवाना, विश्वराजसिंह जडेजा, चेतन सकारिया, प्रेरक मांकड़, दिव्यराजसिंह चौहान, जय चौहान, पार्थ भूत, अग्निवेश अयाची, स्नेहल पटेल, किशन परमार, हिमालय बराड, कुशांग पटेल, पार्थ चौहान आणि देवांग के.
हेही वाचा - IND VS ENG : दुसऱ्या कसोटीत अँडरसनला दिली जाणार विश्रांती
हेही वाचा - अँडरसनने सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना केलं शून्यावर बाद, पाहा रेकॉर्ड