मेलबर्न - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघाला एक जबर झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला दुखापत झाली आहे. यामुळे तो तिसरी कसोटी खेळणार नाही.
जेम्स पॅटिन्सन तिसऱ्या कसोटी सामन्याआधी त्याच्या घरी सुट्टीसाठी गेला होता. तिथे घरात तो पाय घसरून पडला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप पॅटिन्सनच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूची घोषणा केलेली नाही.
-
James Pattinson has been ruled out of the third #AUSvIND Test with bruised ribs following a fall at home 🤕
— ICC (@ICC) January 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He will not be replaced in the squad. pic.twitter.com/xIPnfCU1f4
">James Pattinson has been ruled out of the third #AUSvIND Test with bruised ribs following a fall at home 🤕
— ICC (@ICC) January 4, 2021
He will not be replaced in the squad. pic.twitter.com/xIPnfCU1f4James Pattinson has been ruled out of the third #AUSvIND Test with bruised ribs following a fall at home 🤕
— ICC (@ICC) January 4, 2021
He will not be replaced in the squad. pic.twitter.com/xIPnfCU1f4
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पॅटिन्सनचा समावेश ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आला होता. पण त्याला पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. कारण ऑस्ट्रेलियाचे वेगवान तिकडी पॅट कमिंन्स, जोश हेजलवूड आणि मिशेल स्टार्क फॉर्मात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील पॅटिन्सनला अंतिम स्थान मिळण्याची शक्यता कमीच होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्वॉडमध्ये वेगवान गोलंदाज मायकल नेसर आणि सीन अबॉटचा समावेश आहे. अशात चौथ्या कसोटीसाठी जर गरज भासल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोघांचा विचार करू शकते.
उभय संघात, ७ जानेवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -
टीम पेन (कर्णधार), सीन एबॉट, पॅट कमिंन्स, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, मोयजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मायकल नेसर, जेम्स पॅटिंन्सन, विल पुकोवस्की, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेविड वॉर्नर.
हेही वाचा - टीम इंडियाला दिलासा; वादानंतर संपूर्ण संघाचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह
हेही वाचा - अजिंक्यचा जन्मच क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला; दिग्गजाने केली प्रशंसा