ETV Bharat / sports

गेल पाठोपाठ रसेलने सीपीएलच्या फ्रँचायझीवर केले गंभीर आरोप, म्हणाला... - Russell ON Jamaica Tallawahs

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने, कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलायव्हास फ्रँचायझीवर गंभीर आरोप केले आहेत.

Jamaica Tallawahs is the weirdest' team I've ever played for, says Russell
गेल पाठोपाठ रसेलने सीपीएलच्या फ्रँचायझीवर केले गंभीर आरोप, म्हणाला...
author img

By

Published : Apr 30, 2020, 4:13 PM IST

मुंबई - वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने, कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलायव्हास फ्रँचायझीवर गंभीर आरोप केले आहेत. मी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. पण, जमैका फ्रँचायझीची वागणूक पाहून मला नेहमी, प्रथम श्रेणीतील खेळाडू असल्यासारखे वाटते, असे रसेलने म्हटलं आहे.

रसेलने एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना थलायव्हास संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ मिलर आणि मालक क्रिश पेर्सोद यांच्यावर टीका केली. तो म्हणाला, मी असा खेळाडू आहे जो जिंकण्यासाठी खेळतो आणि मी १३ टी-२० खिताब जिंकली आहेत. मी हरण्यासाठी खेळू इच्छित नाही. मी दोस्ती करताना विश्वास ठेवतो. पण थलायव्हास मला बहुतेक पसंत करत नाही. कारण आपण संघात कोणाला कायम राखणार आहोत? कोणाला नव्याने संघात घेणार आहोत? माझ्या या प्रश्नांचे उत्तर मला कधीच व्यवस्थापनाकडून मिळाले नाही. संघात संवादच होत नाही. त्यामुळे या संघाकडून माझे हे अखेरचे सत्र असू शकते.'

मी कोणी नवखा खेळाडू नाही. पण मला थलायव्हासची वागणूक पाहिल्यास प्रथम श्रेणीतील खेळाडू असल्यासारखे वाटते. तुमच्या मताला काहीच किंमत नसते. मला अशी वागणुक दिली जाते. मी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्यामुळे फ्रँचायझीची विचारधारा काय आहे आणि ते कसे काम करते, हे मला चांगलंच माहित असल्याचेही रसेल म्हणाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच थलाव्हास संघाने स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला रिलीज केले. यामुळे गेलने थलाव्हास संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सारवानवर टीका केली होती. त्याने सारवान तू साप आहेस. कॅरेबिन बेटावर तू कोणालाच आवडत नाहीस. तू अजूनही बालिश आहेस. लोकांसमोर तू चांगला माणूस असल्याचा आव आणतो, पण प्रत्यक्षात तू राक्षस आहेस, अशा शब्दात सरवानला सुनावले होते.

हेही वाचा - HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी

हेही वाचा - काल इरफान आज ऋषी कपूर.. त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; सचिन विराटसह क्रिकेटविश्वातून श्रद्धांजलीचा ओघ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.