ETV Bharat / sports

पांड्या-हुड्डाच्या भांडणात इरफान पठाणची उडी, म्हणाला...

बडोदाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले. कृणालने वादादरम्यान दीपकला धमकी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेवर इरफान पठाणने आपले मत दिले.

irfan pathan wants investigation for BCA in deepak huda and krunal pandya dispute
पांड्या-हुड्डाच्या भांडणात इरफान पठाणची उडी, म्हणाला...
author img

By

Published : Jan 13, 2021, 4:23 PM IST

Updated : Jan 13, 2021, 6:04 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांच्यातील वादाबाबत बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे (बीसीए) चौकशीची मागणी केली आहे. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला प्रारंभ झाला. मात्र, स्पर्धेच्या एका दिवसापूर्वी, दीपक हुड्डाने कृणालवर गंभीर आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली. कृणाल शिवीगाळ करत असल्यामुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने दीपकने बीसीएला पत्राद्वारे कळवले होते.

त्याच्या निर्णयानंतर बीसीएच्या सीईओने दीपकला गैरवर्तन आणि जबाबदारीपासून दूर पळण्याबाबत विधान केले. या सर्व घटनेबाबत आता इरफान पठाणने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''कोरोनाच्या या कठीण काळात खेळाडूचे मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून बायो-बबलमध्ये असताना त्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करावे. अशा घटनांचा खेळाडूवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि या घटना टाळणे आवश्यक आहे.''

यासोबतच इरफानने चांगली कामगिरी केलेल्या ३० वर्षांखालील दोन खेळाडूंना बडोदा संघात स्थान न दिल्याबद्दलही निराशा व्यक्त केली आहे. ३६ वर्षीय इरफान म्हणाला, ''गेल्या हंगामात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्यासाठी आदित्य वाघमोडेने सर्वाधिक धावा (३६४) केल्या आणि स्वप्निल सिंगने अष्टपैलू कामगिरी (१० बळी आणि २१६ धावा) केली परंतु निवडकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.''

''बडोद्याचा माजी कर्णधार म्हणून मी अनेक तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. संघात सुसंवादी वातावरण असणे किती महत्त्वाचे आहे, हे मी जाणतो, जेणेकरून खेळाडूंना सुरक्षित वाटेल आणि मुक्तपणे खेळून ते संघासाठी उत्तम कामगिरी करू शकतील. मी दीपक हुड्डाबद्दल जे ऐकले, ते खरे असेल तर हे खरोखरच धक्कादायक आणि निराशाजनक आहे'', असेही इरफान म्हणाला.

नक्की प्रकरण काय?

बडोदाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना कृणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले. कृणालने वादादरम्यान दीपकला धमकी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रशिक्षकाच्या परवानगीने सराव करत असतानाही कृणालने धमकावण्यास सुरुवात केली असल्याचे दीपकने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.