मुंबई - भारताता माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण या काळात टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत आहे. त्याने एका चित्रपटातील डायलॉगवर टिकटॉक व्हिडिओ केला आहे. यात तो 'पुलिसवालोंका पगार बढाओ, इतना पैसे मे घर नही चलता तो इमान कैसे चलेगा' असे म्हणताना दिसत आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या काळात अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवर भार पडत आहे. लोकांना वारंवार घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. पण काही लोक याचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आपल्या 'खाक्या' दाखवत पोलिसांनी दंडुका प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. या दरम्यान इरफानने व्हिडिओ पोलिसांचा पगार वाढवा, असे म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये इरफान पठाण खुर्चीवर बसलेला दिसतो. बॅकग्राउंडला अमिताभ बच्चनचा चित्रपट अग्निपथमधील डायलॉग आहे. पठाणने अमिताभ बच्चनच्या स्टाइलमध्ये तोच डायलॉग म्हटला आहे. बच्चनप्रमाणेच इरफान पठाणही अॅक्टिंग करत आहे. 'पगार बढाओ, पुलिसवालोंका पगार बढाओ, इतना पैसे मे घर नही चलता तो इमान कैसे चलेगा, या डॉयलॉगवर इरफान पठाणने अॅक्टिंग केली आहे.
दरम्यान, हा टिकटॉक व्हिडिओ शेअर करताना इरफान पठाणने पोलिसांचा खूप आदर आहे. कोरोना व्हायरसच्या कठीण काळात पोलीस कर्तव्य बजावत आहेत. नियम पाळत आहेत. तुम्ही त्यांना सहकार्य करा, असे आवाहन केले आहे. याआधी इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ यांनी कोरोना विषयाची जनजागृती व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा - VIDEO : मेरे हालात ऐसे हैं कि.., मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूला करावं लागतंय घरकाम
हेही वाचा - Video : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कोरोनावर हल्लाबोल, गायलं भन्नाट रॅप सॉन्ग