लंडन - आयर्लंडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अँड्र्यू बाल्बर्नी या संघाचा कर्णधार असेल. क्रिकेट आयर्लंडने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर संघाच्या निवडीविषयी माहिती दिली. साऊथम्प्टन येथे खेळल्या जाणार्या पहिल्या सामन्यासाठी कुर्टिस कँफर आणि हॅरी टेक्टर या दोन नवीन चेहर्यांना संघात संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आयर्लंडने या सामन्यासाठी 22 पैकी 14 खेळाडूंची निवड केली आहे. ज्या 8 खेळाडूंना पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्थान मिळालेले नाही त्यांना जैव-सुरक्षित वातावरणामध्ये राखीव ठेवण्यात येईल, ते संघातच राहतील.
यापूर्वी सोमवारी इंग्लंडने आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली होती.
इंग्लंड वि. आयर्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना - एजेस बाऊल - 30 जुलै
दुसरा सामना - एजेस बाऊल - 1 ऑगस्ट
तिसरा सामना - एजेस बाऊल - 4 ऑगस्ट
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी आयर्लंडचा संघ -
अँड्र्यू बाल्बर्नी (कर्णधार ), कुर्टिस कँफर, जॅरेथ डेलने, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्रिन, बॅरी मॅकार्थी, केव्हिन ओ ब्रायन, विल्यम पोर्टरफिल्ड, बॉयड रँकिन, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉरकन टकर, क्रेग यंग.