ETV Bharat / sports

Final MI vs DC : आयपीएलचा अंतिम सामना विश्वकरंडकाप्रमाणेच मोठा - पोलार्ड - मुंबई वि. दिल्ली प्लेईंग 11

आयपीएलचा अंतिम सामना विश्वकरंडकाप्रमाणेच मोठा आहे. मात्र यंदाच्या सामन्यात दर्शकांची उपस्थिती नसल्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे. असे मत मुंबईचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने व्यक्त केले आहे.

IPL final is bigger then world cup final: pollard
Final MI vs DC : आयपीएलचा अंतिम सामना विश्वकरंडकाप्रमाणेच मोठा - पोलार्ड
author img

By

Published : Nov 10, 2020, 4:56 PM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डने, आजचा सामना विश्वकरंडकाप्रमाणेच महत्वाचा असल्याचे म्हटले आहे.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केरॉन पोलार्डचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलार्डने आजचा अंतिम सामना हा आयसीसी विश्वकरंडकानंतरचा सर्वात महत्वाचा सामना असल्याचे सांगाताना पाहायला मिळत आहे. शिवाय अंतिम सामना म्हटले की दबाव असतोच. त्यामुळे हा सामना दबाव सामना असल्याचे पोलार्ड सांगत आहे.

अंतिम सामन्याचा दबाव प्रत्येक खेळाडूवर राहणार असल्याचेही पोलार्डने नमूद केले. त्यामुळे या सामन्यात जिंकायचे असल्यास आणि कोणतीही चूक करायची नसल्यास हा सामना देखील इतर सामन्याप्रमाणेच खेळण्याची आवश्यकता असल्याचे देखील पोलार्डने सांगितले.

आयपीएलचा अंतिम सामना विश्वकरंडकाप्रमाणेच मोठा आहे. मात्र यंदाच्या सामन्यात दर्शकांची उपस्थिती नसल्यामुळे त्याचा परिणाम होणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या परिणामाचा विचार नकारात्मक न करता सकारात्मक घेऊन सामन्याचा आनंद घेणे गरजेचे असल्याचे पोलार्डने सांगितले.

अशी आहे आयपीएलच्या तेराव्या हंगामात पोलार्डची कामगिरी -

पोलार्ड मुंबई संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू आहे. तो अनुभवी असून त्याने या हंगामातील ११ सामन्यात १९० च्या स्ट्राईक रेटने २५९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत १५ सामन्यात ४ गडीही बाद केले आहेत.

हेही वाचा - IPL २०२० : 'आम्ही जिंकणार', रोहितने व्यक्त केला विश्वास

हेही वाचा - IPL २०२० MI vs DC Final : दिल्लीची 'दिवाळी' की मुंबई मारणार 'पंच'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.