चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला उद्या (शुक्रवार) पासून सुरूवात होणार आहे. त्याआधी जमैकाचा प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. बोल्टने आरसीबीची नविन जर्सी परिधान केलेला फोटो ट्विटरवर शेअर करत खास संदेश लिहला आहे. बोल्टच्या या पोस्टवर खुद्द विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांनी रिअॅक्शन दिली आहे.
बोल्टने ट्विटरवर फोटो शेअर करताना लिहलं आहे की, 'चॅलेंजर्स मी आपणास सांगू इच्छितो मी आजही सर्वात वेगवान आहे.'
बोल्टने त्याच्या ट्विटमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना टॅग केलं आहे. बोल्टच्या या ट्विटला डिव्हिलियर्सने उत्तर दिलं आहे. आम्हाला अतिरिक्त धावांची आवश्यकता असेल तर कुणाला कॉल करायचा हे माहिती आहे, असे उत्तर डिव्हिलियर्स दिले आहे.
-
We know whom to call when we need a few extra runs! 👀 @usainbolt @pumacricket https://t.co/ND228P7yCD
— AB de Villiers (@ABdeVilliers17) April 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We know whom to call when we need a few extra runs! 👀 @usainbolt @pumacricket https://t.co/ND228P7yCD
— AB de Villiers (@ABdeVilliers17) April 7, 2021We know whom to call when we need a few extra runs! 👀 @usainbolt @pumacricket https://t.co/ND228P7yCD
— AB de Villiers (@ABdeVilliers17) April 7, 2021
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने देखील बोल्टला उत्तर दिले आहे. कोणतीही शंका नाही. यामुळेच तु आमच्या संघात आहे, असे उत्तर विराटने दिले आहे.
-
No doubt and that's why we've got you on our team now 🙌 @usainbolt @pumacricket https://t.co/1k3ZkTozR5
— Virat Kohli (@imVkohli) April 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">No doubt and that's why we've got you on our team now 🙌 @usainbolt @pumacricket https://t.co/1k3ZkTozR5
— Virat Kohli (@imVkohli) April 7, 2021No doubt and that's why we've got you on our team now 🙌 @usainbolt @pumacricket https://t.co/1k3ZkTozR5
— Virat Kohli (@imVkohli) April 7, 2021
दरम्यान, विराटच्या आरसीबीने मागील हंगामात प्ले ऑफ फेरी गाठली होती. मात्र ते अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरले. या वर्षी आरसीबीने जय्यत तयारी केली असून त्यांनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिश्चिन, कायले जेमिसन या खेळाडूंना आपल्या संघात घेतले आहे. या वर्षी आरसीबी विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी आशा चाहत्यांची आहे.
हेही वाचा - मुंबई इंडियन्सला फक्त 'हा' संघ देऊ शकतो कडवी टक्कर, 'आकाश'वाणी झाली
हेही वाचा - IPL २०२१ : धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफ फेरी गाठू शकणार नाही; गंभीरचे भाकित