चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा सलामीचा सामना सुरू होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. हा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी विराटने आपल्या संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवला.
आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आरसीबीचा तमू पाहायला मिळत आहे. यात संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटिच आणि कर्णधार विराट कोहली संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढवताना पाहायला मिळत आहेत.
विराट म्हणाला, 'माझी इच्छा आहे की, संघातील सर्व खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावून खेळावं. या हंगामात होणाऱ्या सर्व सामन्यात, ज्यात खेळण्याची संधी मिळेल, त्याचा आनंद घ्यावा. मागील हंगाम आपल्यासाठी चांगला ठरला होता. यंदाच्या हंगामात देखील आपल्याला आणखी चांगली कामगिरी करायची आहे. '
-
T-2 Days: Virat Kohli and AB de Villiers at RCB’s practice session
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full squad training at Chepauk, and some pep talk from the experienced folks, catch what happened at yesterday’s practice session on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/RSXKv6xD6B
">T-2 Days: Virat Kohli and AB de Villiers at RCB’s practice session
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 8, 2021
Full squad training at Chepauk, and some pep talk from the experienced folks, catch what happened at yesterday’s practice session on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/RSXKv6xD6BT-2 Days: Virat Kohli and AB de Villiers at RCB’s practice session
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 8, 2021
Full squad training at Chepauk, and some pep talk from the experienced folks, catch what happened at yesterday’s practice session on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/RSXKv6xD6B
विराटने संघात नव्याने सामिल झालेल्या खेळाडूंचे स्वागत देखील केले. दरम्यान, मुंबई विरुद्ध बंगळुरू यांच्यातील सामन्याला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्क्वाड :
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वाशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलेन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा, कायले जेमीन्सन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अजहरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चियन, केएस भारत, सुयश प्रभुदेसाई, डॅनियल सैम्स आणि हर्षल पटेल.
हेही वाचा - MI vs RCB : रोहित-विराट आमनेसामने, मुंबई Vs चेन्नई यांच्यात सलामीची लढत
हेही वाचा - श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया, वापसीबाबत दिली 'ही' माहिती