ETV Bharat / sports

चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी, 'हा' शिलेदार पुनरागमनासाठी सज्ज - ipl 2021 news

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीतून सावरला असून तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

ipl 2021 : Ravindra Jadeja Gives Fitness Update To Fans
चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी, 'हा' शिलेदार पुनरागमनासाठी सज्ज
author img

By

Published : Mar 25, 2021, 9:29 PM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. हा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीतून सावरला असून तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

रविंद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्याचा हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून माघार घेत उपचारासाठी भारतात परतला होता. त्याच्यावर बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू होते.

उपचाराअंती जडेजा तंदुरुस्त झाला आहे. त्याने जीममध्ये व्यायाम करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्याने जीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो लांब उडी मारताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला सतत पुढे जात राहावे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, जडेजा चेन्नईचा महत्वाचा खेळाडू आहे. तो दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर लवकर चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो. त्याच्या संघात परतल्याने, चेन्नईचा संघ आणखी मजबूत होईल.

हेही वाचा - युवराजचा 'रॉकस्टार' लूक पाहिलात का?, फोटो होतोय तुफान व्हायरल

हेही वाचा - IPL २०२१ : 'मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे', MI चे खेळाडू बायो-बबलमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.