ETV Bharat / sports

RR vs PBKS : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज कडवी झुंज - राजस्थान वि. पंजाब सामना ड्रीम इलेव्हन

आयपीएलच्या सुरू असलेल्या हंगामात आज राजस्थान विरुद्ध पंजाब या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

ipl 2021 : Rajasthan Royals vs Punjab Kings match preview
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज रोमांचक लढत
author img

By

Published : Apr 12, 2021, 12:00 PM IST

मुंबई - आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने पटकावले. त्यानंतर मात्र त्यांना अशी कामगिरी करता आलेली नाही. पंजाब किंग्ज संघाची तर स्पर्धेच्या विजेतेपदाची पाटी तर अद्याप कोरीच आहे. आयपीएलच्या सुरू असलेल्या हंगामात आज याच दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून स्पर्धेत 'विजयारंभ' करण्यास प्रयत्न करतील. उभय संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्य रंगणार आहे.

पंजाब-राजस्थान हेड डू हेड रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ वेळा समोरासमोर आले आहेत. यात राजस्थान रॉयल्सने १२ सामन्यांमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर पंजाब किंग्जला ९ सामन्यात विजय संपादन करता आला आहे. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास आज होणाऱ्या सामन्याआधी राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या मिनी लिलावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. यामुळेच त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. ख्रिस मॉरिस व संजू सॅमसनसह बेन स्टोक्स, जोस बटलर, राहुल तेवतिया यांच्यावर राजस्थान रॉयल्सची मदार असणार आहे.

केएल राहुलच्या पंजाब किंग्जने मागील हंगामात उत्तरार्धात चमकदार कामगिरी केली होती. पण ते प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले. आयपीएलच्या या हंगामात कर्णधार राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरण, मोहम्मद शमी व रवी बिष्णोई यांच्या कामगिरीवर संघाचे भवितव्य अवलंबून आहे. पण पंजाबने यंदा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन याला देखील समाविष्ट केले आहे. त्याच्या कामगिरीही खास नजर असणार आहे.

  • राजस्थान रॉयल्सचा संघ -
  • संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मारकंडे, अँड्रयू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह.
  • पंजाब किंग्सचा संघ -
  • के एल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंह, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरण, सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, हरप्रीत बरार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, इशान पोरेल, दर्शन नालकंडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, जाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मिरेडिथ, मोइजेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलेन आणि सौरभ कुमार.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.