मुंबई - आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर असून ही स्पर्धा भारतातील ६ शहरात खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल. जर त्यांनी या वर्षी विजेतेपद मिळवले तर ती हॅटट्रिक ठरेल. जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक...
मुंबई इंडियन्सचे सामने
तारीख | विरोधी संघ | ठिकाण |
९ एप्रिल | बंगळुरू | चेन्नई |
१३ एप्रिल | कोलकाता | चेन्नई |
१७ एप्रिल | हैदराबाद | चेन्नई |
२० एप्रिल | दिल्ली | चेन्नई |
२३ एप्रिल | पंजाब | दिल्ली |
२९ एप्रिल | राजस्थान | दिल्ली |
१ मे | चेन्नई | दिल्ली |
४ मे | हैदराबाद | दिल्ली |
८ मे | राजस्थान | दिल्ली |
१० मे | कोलकाता | बंगळुरू |
१३ मे | पंजाब | बंगळुरू |
१६ मे | चेन्नई | बंगळुरू |
२० मे | बंगळुरू | कोलकाता |
२३ मे | दिल्ली | कोलकाता |
मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजी होणारे सामने दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील.
हेही वाचा - 'विराट, रोहित आहेत परंतु पंत सारखा खेळाडू मी अजूनपर्यंत पहिला नाही'
हेही वाचा - Women's Day : अनुष्का-वामिकाचा फोटो शेअर करत विराटने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा