चेन्नई - आयपीएल २०२१ चा पाचवा सामना आज गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत विजयाचे खाते उघडण्याच्या शोधात आहे. तर दुसरीकडे कोलकाताची नजर दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थान काबिज करण्यावर आहे. परंतु त्यांच्यासाठी हे काम म्हणावे तसे सोप्प नाही. कारण आकडेवारी पाहिल्यास मुंबईचा संघ वरचढ असल्याची बाब स्पष्ट होते.
हेड टू हेड आकडेवारी -
मुंबई आणि कोलकाता हे संघ आतापर्यंत २७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात तब्बल २१ सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर राहिलेल्या फक्त ६ सामन्यात कोलकाता विजयी ठरली आहे. या दोन्ही संघात झालेल्या गेल्या १२ सामन्यात कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामामध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. यामुळे आजच्या सामन्यात देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे. परंतु, कोलकाताने पहिल्या सामन्यात बलाढ्य सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पांड्या, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्य तारे, एडम मिलने, नाथन कोल्टर नाइल, पीयूष चावला, जेम्स नीशाम, युद्धवीर चरक, मार्को जेनसेन आणि अर्जुन तेंडुलकर.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नीतिश राणा, टिम सेफर्ट, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब-अल-हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.
हेही वाचा - RR vs PBKS : ...माझ्याकडे शब्द नाहीत; पराभवानंतर संजूची प्रतिक्रिया
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दिल्या गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा