ETV Bharat / sports

'पहिला सामना देवाला, खंड पडायला नको म्हणून दुसरे काही नाही', मुंबईच्या पराभवानंतर ट्विटचा पाऊस - आयपीएल २०२१

मुंबईने तब्बल ९ वेळा आपला सलामीचा सामना गमावला आहे. आतापर्यंत मुंबईने ४ वेळा सलामीचा सामना जिंकला आहे. मुंबईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत. यात पहिला सामना देवाला, असे अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

ipl 2021 : fans reaction on mumbai indians lost first match in ipl 2021
'पहिला सामना देवाला, खंड पडायला नको म्हणून दुसरे काही नाही', मुंबईच्या पराभवानंतर भन्नाट मिम्स व्हायरल
author img

By

Published : Apr 10, 2021, 1:00 PM IST

Updated : Apr 10, 2021, 1:07 PM IST

चेन्नई - आयपीएल २०२१ हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. कारण हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर बंगळुरूला विजयासाठी एक धाव हवी होती, त्यांनी ही धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई इंडियन्सने बंगळुरूपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईचे हे आव्हान बंगळुरूने दोन विकेट्स राखत पूर्ण केले.

दरम्यान, मुंबईने तब्बल ९ वेळा आपला सलामीचा सामना गमावला आहे. आतापर्यंत मुंबईने ४ वेळा सलामीचा सामना जिंकला आहे. मुंबईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत. यात पहिला सामना देवाला, असे अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

  • पहिला सामना देवाला 😂😂😂
    खंड पडायला नको म्हणून दुसरे काही नाही@mipaltan पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करूया 😍 #MumbaiIndians https://t.co/TfSu8oQT2A

    — Swarup Rahane (@swaruprahane88) September 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पहिला सामना देवाला

    — सूरज मडये (@Surajmadye13) April 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Losing first match and wining last match is our custom !!
    Spoiler alert 🙌💙
    (पहिला सामना देवाला ) https://t.co/IzjRgvxAZa

    — Saurav Thakur (@iamthakursaurav) April 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईने २०१३ पासून खेळलेला प्रत्येक पहिला सामना गमावला आहे. परंतु यातच मुंबईचे यशाचे गमक असून पहिला सामना गमावल्यानंतरही मुंबईने नंतर जोरदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावले आहेत. २०१३ पासून मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईचा संघ २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या हंगामाचा विजेता आहे.

हेही वाचा - IPL २०२१: आमच्यासाठी पहिला सामना नाही तर विजेतेपद महत्वाचं; सलामीचा सामना गमावल्यानंतर रोहितची प्रतिक्रिया

हेही वाचा - IPL २०२१ : पंतसमोर दिग्गज धोनीचे आव्हान, चेन्नई-दिल्ली यांच्यात आज लढत

Last Updated : Apr 10, 2021, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.