ETV Bharat / sports

आयपीएल २०२१: खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, जाणून घ्या - आयपीएल संघाची शिल्लक राशी न्यूज

फ्रँचायझींना त्यांच्या संघातील सर्व २५ खेळाडू ८५ कोटींच्या आतच बसवायचे आहेत. त्यामुळे यंदा बऱ्याच मोठ्या खेळाडूंना फ्रँचायझींनी यंदा मुक्त केले आहे.

IPL 2021 Auction: Who Can Spend How Much, Team Purse Money Left
आयपीएल २०२१: खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक, जाणून घ्या
author img

By

Published : Jan 21, 2021, 11:39 AM IST

मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. बुधवारी (ता. २०) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामुळे आता प्रत्येक संघाच्या पर्समध्ये शिल्लक रक्कमेत वाढ झाली आहे. तसेच प्रत्येक संघाचा देशी-विदेशी खेळाडूंचा कोटा देखील वाढला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, अ‌ॅरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना आणि उमेश यादव यांना रिलीज केले आहे. आता त्यांच्याकडे ३५.९० कोटी रुपयांची शिल्लक रक्कम आहे. यातून ते ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

चेन्नई सुपर किंग्सने केदार जाधव, हरभजन सिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन यांना करारमुक्त केले आहे. चेन्नईकडे २२.९ कोटी शिल्लक रक्कम आहे. यातून ते ६ भारतीय व १ परदेशी खेळाडू भरू शकतात.

सनरायजर्स हैदराबादने बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव यांना रिलीज केले आहे. सद्य घडीला हैदराबादकडे १०.१ कोटी रुपये शिल्लक रक्कम आहे. यातून ते २ भारतीय व १ विदेशी खेळाडू भरू शकतात.

दिल्ली कॅपिटल्सने मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय यांना करारमुक्त केले आहे. दिल्लीकडे १२.९० कोटी शिल्लक रक्कम आहे. यातून त्यांना ४ भारतीय व २ परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेता येते.

कोलकाता नाईट रायडर्सने टॉम बैंटन, ख्रिस ग्रीन, सिद्धेश लाड, निखिल नाइक, हॅरी गर्नी, एम सिद्धार्थ यांना करारमुक्त केले आहे. केकेआरकडे १०.७५ कोटी शिल्लक रक्कम आहे. तसेच ६ भारतीय व २ परदेशी खेळाडू ते खरेदी करू शकतात.

मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख यांना करारमुक्त केले. आता मुंबईकडे १५.३५ कोटी शिल्लक रक्कम राहिली आहे. यात ते ३ भारतीय व ४ परदेशी खेळाडू घेऊ शकतात.

किंग्स इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तिजंदर सिंह यांना रिलिज केले. पंजाबकडे ५३.२० कोटी शिल्लक रक्कम आहे. यातून ते ४ भारतीय व ५ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

राजस्थान रॉयल्सने स्टिव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरु ण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह यांना करारमुक्त केले. राजस्थानकडे ३४.८५ कोटी रुपये शिल्लक रक्कम असून ते ५ भारतीय व ३ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.

दरम्यान, फ्रँचायझींना त्यांच्या संघातील सर्व २५ खेळाडू ८५ कोटींच्या आतच बसवायचे आहेत. त्यामुळे यंदा बऱ्याच मोठ्या खेळाडूंना फ्रँचायझींनी यंदा मुक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.