मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. चेन्नईमध्ये या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्सं बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त १५ दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. यामुळे आपापल्या संघातील खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबई इंडियन्सचे खेळाडू देखील बायो-बबलमध्ये यायला सुरूवात झाली आहे.
-
🧳✅#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @iamanmolpreet28 @MarriottBonvoy pic.twitter.com/SNDBsoJ5vz
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🧳✅#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @iamanmolpreet28 @MarriottBonvoy pic.twitter.com/SNDBsoJ5vz
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2021🧳✅#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @iamanmolpreet28 @MarriottBonvoy pic.twitter.com/SNDBsoJ5vz
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2021
नॅथन कुल्टर नाईल, इशान किशन, पियूष चावला, अर्जुन तेंडुलकर या खेळाडूंसह मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बायो-बबलमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने यांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत मुंबईने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याला, मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
-
मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy pic.twitter.com/ez1IYQgCaI
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy pic.twitter.com/ez1IYQgCaI
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2021मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @MarriottBonvoy pic.twitter.com/ez1IYQgCaI
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2021
दरम्यान, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या हे खेळाडू सध्या इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळत आहेत. ही मालिका संपल्यानंतर हे सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील.
अर्जुन तेंडुलकर मुंबई पलटणमध्ये दाखल...
आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरवर बोली लावत आपल्या पलटणमध्ये घेतले आहे. २० लाखांच्या मूळ किंमतीत त्याला मुंबईने आपल्या ताफ्यात घेतले आहे.
हेही वाचा - IPL २०२१: धोनीच्या हस्ते चेन्नईच्या नविन जर्सीचे अनावरण, जर्सी पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
हेही वाचा - एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला...