ETV Bharat / sports

SRH vs MI : मुंबईचा लाजिरवाणा पराभव, हैदराबाद प्लेऑफसाठी पात्र - मुंबई स्कॉड टुडे

मुंबईविरुद्धच्या विजयामुळे हैदराबादने प्लेऑफसाठीच्या तिसऱ्या स्थानावर आपले नाव पक्के केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसला.

SRH vs MI LIVE
SRH vs MI LIVE
author img

By

Published : Nov 3, 2020, 6:36 PM IST

Updated : Nov 3, 2020, 11:07 PM IST

शारजाह - सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी अभेद्य भागिदारी रचत सनरायझर्स हैदराबादला मुंबईविरुद्धच्या सामन्यात १० गड्यांनी विजय मिळवून दिला. या विजयामुळे हैदराबादने प्लेऑफसाठीच्या तिसऱ्या स्थानावर आपले नाव पक्के केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसला.

मुंबईच्या दीडशे धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर-साहाने नाबाद विजयी भागिदारी रचली. वॉर्नरने १ षटकार आणि १० चौकारांसह ८५ धावांची खेळी केली. तर, साहाने १ षटकार आणि ७ चौकारांसह ५८ धावा केल्या. मुंबईने आज बोल्ट आणि बुमराहला विश्रांती देत धवल कुलकर्णी आणि जेम्स पॅटिन्सनवर वेगवान गोलंदाजीची धूरा सोपवली. मात्र, त्यांना अपयश आले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून हैदराबादने मुंबईला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डची झुंजार खेळी आणि सूर्यकुमार यादवच्या बहुमूल्य योगदानाच्या जोरावर मुंबईने हैदराबादला दीडशे धावांचे आव्हान दिले. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर मुंबईच्या आठ फलंदाजांना तंबूत परतावे लागले. संघात पुनरागमन केलेला कर्णधार रोहित शर्मा क्विंटन डी कॉकसोबत सलामीसाठी फलंदाजीला आला. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. संदीप शर्माने त्याला ४ धावांवर बाद केले. त्यानंतर डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी धावफलक हलता ठेवला. २५ धावांवर असताना डी कॉकचा संदीप शर्माने त्रिफळा उडवला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमारने संघाची धावगती वाढवली. सूर्यकुमारने ३६ तर, किशनने ३३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव कोसळला. काही धावांच्या अंतराने कृणाल पांड्या, सौरभ तिवारी हे फलंदाज बाद झाले. डावाच्या शेवटच्या षटकांत कायरन पोलार्डने मोठे फटके खेळले. पोलार्डने २५ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ लाभली नाही. हैदराबादकडून संदीप शर्माने ३, जेसन होल्डर आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी २ तर राशिक खानने १ बळी घेतला.

MATCH UPDATE :

  • हैदराबादचा मुंबईवर १० गडी राखून विजय.
  • अठराव्या षटकात हैदराबाद विजयी.
  • १२ षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद ११० धावा.
  • वृद्धिमान साहाचे अर्धशतक, खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश.
  • डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, खेळीत ६ चौकार आणि एक षटकार.
  • दहा षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद ८९ धावा.
  • नऊ षटकानंतर साहा आणि वॉर्नर वैयक्तिक ४१ धावांवर नाबाद.
  • हैदराबादला ७८ चेंडूत ८५ धावांची गरज.
  • पाच षटकात हैदराबादच्या बिनबाद ४९ धावा.
  • चार षटकानंतर वॉर्नर १६ आणि साहा २२ धावांवर नाबाद.
  • तीन षटकानंतर हैदराबादच्या बिनबाद २४ धावा.
  • साहाची आक्रमक सुरुवात.
  • हैदराबादचे सलामीवीर फलंदाज मैदानात.
  • २० षटकात मुंबईच्या ८ बाद १४९ धावा.
  • शेवटच्या षटकात पोलार्ड ३५ धावा काढून बाद. होल्डरचा दुसरा बळी
  • १९व्या षटकात पोलार्डचे सलग तीन षटकार.
  • पॅटिन्सन मैदानात.
  • कुल्टर नाइल बाद. होल्डरने धाडले माघारी.
  • सतरा षटकानंतर मुंबईच्या ६ बाद ११६ धावा.
  • कुल्टर नाइल मैदानात.
  • किशन ३३ धावांवर बाद, संदीप शर्माचा तिसरा बळी.
  • पंधरा षटकानंतर मुंबईच्या ५ बाद ९८ धावा.
  • तेरा षटकानंतर मुंबईच्या ५ बाद ८७ धावा.
  • कायरन पोलार्ड मैदानात.
  • तिवारी १ धाव काढून बाद, राशिदला मिळाली विकेट.
  • सौरभ तिवारी मैदानात.
  • नदीमच्या गोलंदाजीवर कृणाल शून्यावर बाद.
  • कृणाल पांड्या मैदानात.
  • सूर्यकुमार ३६ धावांवर बाद.नदीमच्या गोलंदाजीवर यष्टीचित.
  • दहा षटकानंतर मुंबईच्या २ बाद ७८ धावा.
  • नऊ षटकानंतर सूर्यकुमार २८ तर किशन ८ धावांवर नाबाद.
  • पाच षटकानंतर मुंबईच्या २ बाद ३९ धावा.
  • इशान किशन मैदानात.
  • डी कॉक २५ धावांवर बाद, संदीप शर्माचा दुसरा बळी.
  • सूर्यकुमारची आक्रमक सुरुवात.
  • सूर्यकुमार मैदानात.
  • संदीप शर्माने रोहितला केले बाद.
  • मुंबईला पहिला धक्का, रोहित ४ धावांवर बाद.
  • पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद ५ धावा.
  • संदीप शर्माकडून हैदराबादसाठी पहिले षटक.
  • मुंबईचे सलामीवीर रोहित-क्विंटन मैदानात.
  • नाणेफेक जिंकून हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय.
  • रोहित शर्मा-डेव्हिड वॉर्नर नाणेफेकीसाठी मैदानात.
  • थोड्याच वेळात होणार नाणेफेक.

सनरायझर्स हैदराबाद -

डेव्हिड वार्नर (कर्णधार), केन विल्यमसन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धीमान साहा, अब्दुल समद, राशिद खान, जेसन होल्डर, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, टी. नटराजन.

मुंबई इंडियन्स -

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, जेम्स पॅटिंन्सन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, नॅथन कुल्टर नाइल, धवल कुलकर्णी.

Last Updated : Nov 3, 2020, 11:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.