नवी दिल्ली - इंडियन प्रीमयर लीगच्या २०२० हंगामासाठी खेळाडूंच्या अदलाबदलीची (ट्रेड विंडो ) प्रक्रिया मुदत संपली आहे. संघांनी करारमुक्त केलेल्या 'त्या' खेळाडूंचा लिलाव १९ डिंसेबरला कोलकातामध्ये होणार आहे. या लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे. वाचा कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे....
अदलाबदली प्रकिया बंद झाल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रहिली आहे त्याची आकडेवारी -
- किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी
- कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी
- राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी
- चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी
- मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी
अदलाबदलीत आठ संघांनी ७१ खेळाडूंना करारमुक्त केले आहेत. तर संघांनी एकूण १२७ खेळाडू कायम ठेवले असून यामध्ये ३५ विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने डेव्हिड मिलर, अँड्र्यू टे, सॅम कुरन, वरून चक्रवर्ती या खेळाडूंना करारमुक्त केले आहे.
हेही वाचा - IPL लिलावापूर्वी 'असे' आहेत संपूर्ण संघ, कोणत्या संघात कोणता खेळाडू वाचा एका क्लिकवर...
हेही वाचा - हॉटेलमध्ये परतल्यावर तू काय करतो? पत्रकाराच्या प्रश्नावर मयांकचे मजेशीर उत्तर
हेही वाचा - गंभीर ट्रोलर्स कंपनीला म्हणतो,...तर द्या हव्या तितक्या शिव्या, वाचा काय आहे प्रकरण