मुंबई - कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू आहेत. अशात साराने एक इन्साग्राम पोस्ट केली आहे. यावरून पुन्हा सारा आणि शुबमन यांच्या चर्चांना ऊत आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शुबमन गिलकडे टीम इंडियाचा भावी सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. भारतातील सध्याच्या फळीतीत युवा फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामातील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळून आहेत. पण त्याला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. पण त्याने क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केली. शुबमनने क्षेत्ररक्षणात केलेल्या जबरदस्त कामगिरीचे साराने कौतुक केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुंबई विरुद्धच्या सामन्यातील क्षेत्ररक्षणात शुबमनने कमाल केली होती. त्या क्षणाचा व्हिडिओ साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यासोबत तिने 'लव'चा इमोजी जोडला आहे. साराच्या या पोस्टवरून दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
दरम्यान, शुबमन गिल आणि सारा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे. याआधी दोघांनी एकाच वेळी 'I SPY' असे कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्याआधी शुबमनने कार घेतल्यानंतर साराने त्याचे अभिनंदन केले होते. यावर हार्दिक पांड्याने शुभमन गिलची फिरकी घेतली होती.
IPL २०२० : स्मिथने लगावला धोनीचा ट्रेडमार्क असलेला हॅलिकॉप्टर शॉट; गोलंदाज अवाक
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोन्स यांचे मुंबईत अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा