शारजाह - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १८४ धावा केल्या. मात्र राजस्थान रॉयल्स संघ आपले सर्व गडी गमावत केवळ १३८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ४६ धावांनी हा सामना जिंकला.
राजस्थानकडून फलंदाजीसाठी आमंत्रण मिळालेल्या दिल्लीने २० षटकात ८ बाद १८४ धावा केल्या. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ (१९) आणि शिखर धवन (५) अपयशी ठरले. या दोघांना जोफ्रा आर्चरने बाद केले. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यरही २२ धावांवर माघारी परतला. अय्यर आणि ऋषभ पंत (५) धावबाद झाले. दिल्लीची वरची फळी उध्वस्त झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिस आणि शिमरोन हेटमायरने संघाची धावसंख्या वाढवली. स्टॉइनिसने ४ षटकारांसह ३९ तर, हेटमायरने ५ षटकार आणि एका चौकारासह ४५ धावा केल्या. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने शेवटच्या षटकांत फटकेबाजी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २४ धावांच ३ फलंदाजांना बाद केले. तर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. राजस्थानने अँन्ड्र्यू टाय आणि वरुण आरोनला संधी दिली आहे.
LIVE UPDATE :
- पंधरा षटकानंतर राजस्थानच्या ७ बाद १०१ धावा.
- आर्चर बाद, रबाडाला मिळाली आर्चरची विकेट.
- राजस्थानला विजयासाठी ३७ चेंडूत ९५ धावांची गरज.
- १३.५ षटकानंतर राजस्थानच्या ६ बाद ९० धावा.
- आर्चर मैदानात.
- टाय बाद. अक्षर पटेलने केले बाद.
- अँन्ड्र्यू टाय फलंदाजीसाठी मैदानात.
- राजस्थानचा पाचवा फलंदाज बाद. स्टॉइनिसने उडवला यशस्वीचा त्रिफळा.
- राजस्थानला विजयासाठी ५२ चेंडूत १०९ धावांची गरज.
- अश्विनचा राजस्थानला धक्का, महिपाल बाद.
- महिपाल लोमरोर मैदानात.
- सॅमसन पुन्हा अपयशी, स्टॉइनिसने ५ धावांवर धाडले माघारी.
- दहा षटकानंतर राजस्थानच्या २ बाद ६५ धावा.
- संजू सॅमसन मैदानात.
- स्टिव्ह स्मिथ २४ धावांवर माघारी, नॉर्ट्जेने केले बाद.
- राजस्थानला विजयासाठी ७२ चेंडूत १२९ धावांची गरज.
- आठ षटकानंतर यशस्वी १६ तर स्मिथ २४ धावांवर नाबाद.
- पाच षटकात राजस्थानच्या १ बाद ३३ धावा.
- अश्विनने धाडले बटलरला माघारी. स्मिथ मैदानात.
- राजस्थानला पहिला धक्का, बटलर १३ धावांवर माघारी.
- पहिल्या षटकात राजस्थानच्या बिनबाद १० धावा.
- जोस बटलरकडून डावाचा पहिला चौकार.
- कगिसो रबाडा टाकतोय दिल्लीसाठी पहिले षटक.
- राजस्थानचे सलामीवीर मैदानात.
- दिल्लीच्या २० षटकात ८ बाद १८४ धावा.
- शेवटच्या षटकात हर्षल पटेल बाद.
- १९व्या षटकात अक्षर बाद. दिल्लीच्या ७ बाद १८१ धावा.
- अठरा षटकानंतर दिल्लीच्या ६ बाद १५९ धावा.
- अक्षर पटेल मैदानात.
- हेटमायरच्या खेळीत ५ षटकार आणि एक चौकार.
- हेटमायरच्या २४ चेंडूत ४५ धावा.
- त्यागीच्या गोलंदाजीवर हेटमायर झेलबाद.
- हेटमायरमुळे दिल्ली दीडशे धावसंख्येच्या जवळ.
- पंधरा षटकानंतर दिल्लीच्या ५ बाद १२२ धावा.
- चौदा षटकानंतर दिल्लीच्या ५ बाद १०९ धावा.
- हर्षल पटेल मैदानात.
- स्टॉइनिसच्या खेळीत ४ षटकारांचा समावेश.
- तेवतियाने स्टॉइनिसला ३९ धावांवर केले बाद.
- १२ षटकानंतर स्टॉइनिस ३५ धावांवर नाबाद.
- दहा षटकानंतर दिल्लीच्या ४ बाद ८७ धावा.
- चोरटी धाव घेताना पंत तेवतियाच्या गोलंदाजीवर धावबाद.
- ऋषभ पंत धावबाद, शिमरोन हेटमायर मैदानात.
- स्टॉइनिसची आक्रमक सुरुवात.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- दिल्लीचा कर्णधार २२ धावांवर बाद, जयस्वालने केले धावबाद.
- पाच षटकानंतर दिल्लीच्या २ बाद ४३ धावा.
- ऋषभ पंत मैदानात.
- आर्चरचा दुसरा बळी, पृथ्वी १९ धावांवर माघारी.
- पृथ्वीकडून सामन्याचा पहिला षटकार.
- दिल्लीचा कर्णधार मैदानात.
- दिल्लीला पहिला धक्का, आर्चरच्या गोलंदाजीवर धवन माघारी.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ७ धावा.
- शिखरच्या बॅटमधून सामन्याचा पहिला चौकार.
- वरुण आरोन टाकतोय राजस्थानसाठी पहिले षटक.
- दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ मैदानात.
- नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग XI -
स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जोस बटलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, वरुण आरोन, यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी, अँन्ड्र्यू टाय.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग XI -
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, मार्कस स्टॉइनिस, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, एनरिक नॉर्ट्जे.